छिंदमने शिवसेनेला मत दिले तरी ग्राह्य धरू नये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक आज होत आहे. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम देखील महापालिकेत उपस्थित राहिला आहे. मात्र छिंदम यांनी महापौर पदासाठी बाळासाहेब बोराटे आणि उपमहापौर पदासाठी गणेश उर्फ उमेश कवडे यांना मतदान केल्यास ते ग्राह्य धरले जाऊ नये अशी विनंती शिवसेना नगरसेविका आणि गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी केली आहे. शिवसेना गटनेत्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे.