थर्टी फस्टसाठी कोकणात पर्यटकाची धूम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

कोकणात थर्टी फस्टच्या सादरीकरणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पर्यटकांनी समुद्रकिनारे बहरले असून काहीनी थर्टी फस्टची घरातच तयारी केली आहे.”प्या”रेलाल मंडळीनी रविवार पासूनच थर्टी फस्टचा जल्लोष करायला सुरुवात केली आहे.”प्या”रेलाल मंडळींच्या उद्या परमिट रूम,बिअरबार मध्ये मुदतवाढ दिली असली तरी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमावर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर रहाणार आहे.

थर्टी फस्टसाठी पर्यटकांनी कोकणातले समुद्र किनारे निवडले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर,वळणेश्वर,गणपतीपुळे,मालगुंड,मांडवी,भाट्येसमुद्र किनारे पर्यटकांनी बहरले आहे.आज रविवार असल्यामुळे अनेकांनी सरत्या वर्षाचा निरोप समारंभ आजपासून सुरु केला.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील हॉटेल आणि रेस्टॉरंट सज्ज झाली आहेत.

पहाटे पाच पर्यंत मद्य”पी”
थर्टी फस्टसाठी उत्पादन शुल्क विभागात तळीरामांच्या आनंदात मद्यशर्करा योग आणतात. उद्या परमिट रुम आणि बिखर शॉपीसाठी पहाटे पाच वाजे पर्यंत परवानगी आहे.तळीरामांना परमिट रूम मध्ये एन्जॉय करायला मिळणार आहे.बिअर शॉपीला आणि वाईन शॉपीला रात्री एक वाजेपर्यंत,देशीदारूलाही रात्री एक वाजेपर्यंत मुदत आहे.सार्वजनिक ठिकाणांवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर रहाणार आहे. उद्या साठी पार्टी करणाऱ्या मंडळींना एक दिवसाला परवाना घ्यावा लागतो.तसेच तळीरामांना एक दिवसासाठी विदेशी मद्यासाठी पाच रूपयाचा आणि देशी मद्यासाठी तीन रुपयाचे वैयक्तिक परवाना खिशात ठेवावे लागणार आहेत.