
सामना ऑनलाईन, पुणे
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने टेनिस जगतातील अनेक प्रतिभावान खेळाडू पुण्यात आले आहेत. या मातब्बर टेनिसपटूंचा खेळ पाहून नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर टेनिस स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील नामांकित खेळाडू या ठिकाणी आले आहेत. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी आहे. या टेनिस मैदानातून भविष्यातील चॅम्पियन खेळाडू उदयाला येतील, आसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


























































