‘यूजीसी’चा विद्यार्थी, शिक्षक, पालकांना घेऊन रॅगिंगविरोधी लढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रॅगिंगविरुद्ध कडक कायदे करूनही अधूनमधून तशा घटना कानावर येतात. रॅगिंग पूर्णपणे रोखण्यासाठी रॅगिंग करणाऱया आणि त्यामुळे प्रभावित होणाऱया घटकांनाच घेऊन मोहीम हाती घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला आहे. विद्यार्थी विद्यार्थ्यांची रॅगिंग करतात. त्याचा त्रास पालक, शिक्षकांना भोगावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांना घेऊनच रॅगिंगविरोधी मोहीम राबवणार आहे.

रॅगिंग रोखण्यासाठी ‘यूजीसी’ देशातील शिक्षण संस्थांमध्ये जनजागृती मोहीम राबवणार आहे. त्यात शिक्षक, कर्मचाऱयांसह विद्यार्थी आणि पालकही सहभागी होणार आहेत. त्यासंदर्भात ‘यूजीसी’ने सर्व महाविद्यालयांना परिपत्रक पाठवले आहे. या जनजागृती मोहिमेसाठी ‘यूजीसी’ने पाच लघुपट बनवले आहेत.

रॅगिंग रोखण्यासाठी स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. रॅगिंग प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.रॅगिंगबाबत माहितीसाठी 18001805522 हा हेल्पलाइन क्रमांक आहे.