कोंढव्यात एक लाखाचा चरस जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

कोंढव्यात चरस विक्री साठी आलेल्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. या तरुणाकडून ९५ हजार ६४० रुपयांचा चरससह इतर ऐवज जप्त केला.

कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंपाजवळ एकजण चरस या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदाक इक्बाल शेख यांना मिळाली.

त्यानुसार सापळा रचून शेहबाज अहम्मद शहाबुद्दीन अन्सारी (वय २६, रा.मुंबई मुळ रा. बीजनोर उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचे ६१३ ग्रॅम चरस जप्त केले. ३ हजाराचा मोबाईल, ५४० रुपयांची रोख रक्कम असा ९५ हजार ६४० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उप निरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी राजस शेख ,सचिन शिंदे, विलास तोगे, योगेश कुंभार, वणवे, पृथ्वीराज पांडुळे, सुरेंद्र कोळगे, अझीम शेख ,आदर्श चव्हाण, उमाकांत स्वामी, उमेश शेलार या पथकाने कारवाई केली.