लातुरात सिगारेटचे गोदाम फोडले, 54 लाख 47 हजारांचा माल लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर शहरातील सिगारेटचे गोदाम फोडून चोरट्यांनी सिगारेटची 54 बॉक्स पळवले. तब्बल 54 लाख 47 हजार 200 रुपयांच्या चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चोरीप्रकरणी निलेश दामोदर अग्रवाल राहणार लक्ष्मी नगर कॉलनी लातूर यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीचे दुर्गेश्वरी मार्केटिंग अँड एजन्सिज प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी आहे. सिगारेट, चिप्स, बिस्किट अशा विविध प्रकारच्या वस्तूंची एजन्सी असल्यामुळे हा सर्व मार्ग गोदामात ठेवण्यात येतो. अज्ञात चोरट्याने गोदामाचे समोरील व आतील लोखंडी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील गोल्डफ्लेक प्रीमियम व किंग लाईट सिगारेटचे 54 बॉक्स ( किंमत 54 लाख 47 हजार दोनशे रुपये) पळवून नेले. चोरी करून जाताना त्यांनी गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत.