महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या दुसर्‍या पर्वाला 7 जानेवारीपासून सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 सामना ऑनलाईन । मुंबई 

पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणलं आहे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चं दुसरं पर्व. या कार्यक्रमाचे पहिले पर्व नुकतेच संपले असून प्रेक्षकांना दुसर्‍या पर्वाची गोड बातमी दिल्यावर पुन्हा एकदा तिच कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांचे कुतुहल निर्माण झाले आहे.

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वाची दोन खास वैशिष्ट्य आहेत. आणि ते म्हणजे जजेस सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे सुध्दा हा कार्यक्रम जज करणार आहेत आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा महेश कोठारे यांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार.