फिटनेस : पोहणं My Life

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सात महासागर पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे नेहमीच आहाराबाबत जागरूक असतो.

फिटनेस म्हणजे :  नियमित करण्याची गोष्ट आणि माझ्यासाठी लाइफलाइन.

जलतरण की आरोग्य : जलतरणामुळे आरोग्य. त्यामुळे जलतरण आधी.

डाएट की जीवनशैली : डाएट. चांगला डाएट घेतला की जीवनशैली चांगलीच होते.

सामान्य माणसासाठी फिटनेस : प्रत्येकाने स्वतःसाठी तासभर तरी काढावा. निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

व्यायाम कसा करावा :  नियमित थोडा थोडा व्यायाम केला तर चांगलाच असतो. जॉगिंग, योगा, मेडिटेशन करायला हवे.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : व्यायामाबरोबर डाएट महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही परफॉर्म करत असता तेव्हा व्यायामाबरोबरच ताकदीसाठी डाएटही तितकाच आवश्यक असतो. जेवढा व्यायाम तेवढाच डाएट महत्त्वाचा आहे.

जलतरण म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा : जलतरण म्हणजे आरोग्य नंतर स्पर्धा. चांगल्या स्पर्धेतून कामगिरी दिसते.

दिवसातून पाणी किती प्यावे : माणसाने किमान एक लीटर पाणी प्यावे. तेवढे पाणी शरीरात जाणे गरजेचे आहे. मी साधारण दोन लीटर पाणी पितो.

व्यायामाला किती वेळ देता? : सकाळी दोन तास, संध्याकाळी दोन तास.

जीमला जायला मिळाले नाही तर…? :  शक्यतो मी जीम चुकवत नाही. पण ज्या दिवशी जीमला जाणे शक्य होत नाही, त्या दिवशी व्यायाम होतच नाही.

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : बाहेर जायचे असल्यास तिथे मी बनवून जेवतो. असं घर किंवा हॉटेल बघतो जिथे स्वतःचे जेवण स्वतः बनवता येते. मी ट्रव्हल करतो तेव्हा शक्यतो जेवणाचे सगळे सामान घेऊन जातो. माझा प्रवास हा वीस -बावीस दिवसांचा असतो. अशा वेळी इतकेदिवस बाहेर खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

कोणता पदार्थ नियमित खाता? : दूध, अंडी.

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलास? : चहा, कॉफी, चाट.

फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : खेळाडूंचे ब्लॉग, वेबसाईट वाचतो आणि स्वतःला अपडेट ठेवतो.

फिटनेस मंत्र : फिटनेस रोज केला तरच होतो. त्यामुळे नियमितता आणि सातत्य असले पाहिजे.