माजी रणजीपटूचा मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी 

गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44 वर्षे) याचा मैदानावर खेळत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात खेळत असताना ही घटना घडली.

लढतीवेळी राजेश घोडगे याला ह्रदयविकाराचा झटका आला. या संघात खेळाडू म्हणून डॉक्टर्सही होते. त्यांनी राजेशवर उपचार केले. त्यानंतर त्याला जवळच्याच इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याला मृत जाहीर केले.