
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
शुक्रवारी संभाजीनगरमध्ये एका घराला मोठी आग लागली. या आगीत दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात घरातील इतर सदस्यही जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद वाहिद बेग यांच्या घराला शॉट सर्कीट मुळे आग लागली. या आगीत पाच मुलांसह घरातील आठ सदस्य गंभीर जखमी झाले. तर नूर बेग या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. इतर सदस्यही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


























































