आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रविवारच्या मेगा ब्लॉकने हाल सोसल्यानंतर सोमवारी उत्साहाने कामावर निघालेल्या मुंबईकरांच्या उत्साहावर मध्य रेल्वेच्या खोळंब्याने पाणी ओतलं आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या सुमाराला स्थानकांवर रीघ वाढत असून गाड्याही गर्दीने खचाखच भरून गेल्या आहेत.