

2016 च्या आकडेवारीनुसार येथे हिंदूंची लोकसंख्या जवळपास 4 लाख 40 हजार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येथे हिंदू राहात असल्याने त्यांच्या धार्मिक भावनांचा गंभीरपणे विचार करून गोमांसाचा अंश असलेल्या नोटा छापणे बंद करण्यात यावे, अशी मागणी युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदुइझमचे अध्यक्ष राजन वेद यांनी रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाकडे केली आहे. ऑस्ट्रेलियात 2019 मध्ये 20 डॉलर आणि 2020 साली 100 डॉलरच्या नवीन नोटा येणार आहेत. यातही गोमांसाचे अंश असल्याने अशा नोटा न छापण्याचे आवाहन येथील हिंदू व शाकाहारी नागरिकांनी आरबीआयला केले आहे.
सर्वप्रथम 2016 साली नोटांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे समोर आले होते. त्यावरून खळबळ उडाली होती. त्यानंतर इंग्लडने नोटांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे ट्विटर मान्य केले होते. ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने नोटांवर लावण्यात आलेल्या प्राण्यांच्या चरबीचा थर आमच्याच कंपनीने तयार केल्याचे मान्य केले होते. तसेच पण आपल्या परवानगीशिवायच त्यांचा नोटांमध्ये वापर करण्यात आल्याचा आरोपही कंपनीने केला होता.




























































