
सामना प्रतिनिधी । नाशिक
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट महाराष्ट्रासह देश-विदेशात ढोल-ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकांसह दणक्यात प्रदर्शित झाला. नाशिकमध्येही याचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नाशिकच्या कॉलेजरोड येथील सिनेमॅक्स चित्रपटगृह येथे शुक्रवारी दुपारी ढोल-ताशांच्या गजरात ‘ठाकरे’ सिनेमाचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकडवाड यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.
























































