
सामना प्रतिनिधी । परभणी
जिल्ह्यातील मानवत येथील आठवडी बाजारात असलेल्या हॉटेलमध्ये गॅसच्या टाकी लीक होऊन आग लागली व त्यानंतर त्या टाकीचा स्फोट झाल्याने रस्त्यालगतची ५ दुकाने आगीत भस्मसात झाली. यात एक हॉटेल, सलून, मोबाईल शॉपी, अॅटोमोबाइल्स, टेलरींग व बोअरवेलचे कार्यालये अशी पाच दुकाने होती.
सोमवार हा बाजारचा दिवस असल्याने बाजार लागत असलेले शिवशंकर हॉटेल हे सकाळी लवकर उघडले होते. त्याचे मालक भास्कर काळे नेहमीप्रमाणे हॉटेलचे लागणारे पदार्थ तयार करीत असतांना गॅस चालू करताच लीक त्याचा भडका झाला. वेळीच सावध होत भास्कर काळे हे तेथून निघाले त्यांना थोडे भाजल्याने ते तत्काळ उपचारासाठी गेले. परंतु दरम्यानच्या काळात या आगीने रुद्र रूप धारण करीत तेथील गॅस टाकीचा स्फोट झाल्याने लागत असलेल्या सर्वच दुकानांनी पेट घेतला नगर पालिकेची अग्निशामक दलाची गाडी सुरु न झाल्याने २० मिनिटे उशिरा आली. गाडी येताच उपस्थित सर्व नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमाने आग विझवण्यात यश आले.
परंतु यावेळात दुकाने १०० टक्के आगीत भासमसत झाली. आग लागल्याची वार्ता कळताच घटना स्थळी न.प. अध्यक्ष डॉ. अंकुश लाड, मुख्याधिकारी उमेश ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. या आगीत भास्कर काळे यांचे शिवशंकर हॉटेल, रामेश्वर राऊत यांचे सलून बळीराम दहे यांचे टेलरींग, सतीश चव्हाण यांचे अॅटोमोबाइल्स व मोबाईल शॉपी, बंडू तुरे यांचे बोअर वेल ऑफिस जळून खाक झाले आहे.
शिवसेनेचे समाजकारण दर्शन
या घटनेची माहिती मिळताच शहरप्रमुख बालाजी दहे हे घटना स्थळी दाखल झाले आणि अग्नीशमन दलाच्या गाडीचा पाईप हातात घेत स्वतः या आगीच्या व दूरच्या आग डोंबात विझवण्यासाठी सरसावलेल्या शिवसेना शहरप्रमुख बालाजी दहे यांनी यांच्यासह नागरिक देखील आग विझवण्यासाठी सरसावले होते.
या घटनेतील सर्व दुकाने हे अतंत्य छोटी असून या सर्व दुकान धारकांना महसूल प्रशासनाकडून तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्याच अनुषंगाने तहसीलदार डी.डी. फुफाटे यांना घटनास्थळावरून लोंकानी कॉल केले. परंतु तहसीलदार यांनी कोणाचाही कॉल घेतला नाही. चिडून लोकांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना कॉल केला त्यांनी देखील फोन न घेतल्याने एका शिवसैनिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कॉल केला त्याची दाखल घेत त्यांनी जिल्हाधिकार्यांना तत्काळ कळवून संबंधित घटनेचा रीतसर पंचनामा करण्याचे आदेश दिले. या सर्व बाबीवरून शिवसेना समाजकारण करते, अशी उपस्थितीत कुजबुज चालू होती.





























































