व्हिडीओ कॉलद्वारे महिलेचा विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अश्लील मेसेज आणि व्हिडीओ कॉल करून व्यावसायिकाच्या पत्नीचा विनयभंग करणाऱ्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या व्यक्तीचा गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार महिला या अंधेरी येथील उच्चभ्रू सोसायटीत राहतात. त्यांचे पती हे व्यावसायिक आहेत. पाच दिवसांपूर्वी त्या खरेदीकरिता एका मॉलमध्ये गेल्या होत्या. सायंकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल केला तेव्हा त्यावर एका मुलीचे नाव आले. ते नाव महिलेच्या परिचित असलेल्या नातेवाईकाच्या मुलीशी साम्य होते. नेटवर्क नसल्यामुळे त्यांनी फोन बंद केला. काही वेळाने त्यांनी फोन सुरू केला. फोन सुरू करताच महिलेला अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून अश्लील वर्तन केले. त्यामुळे महिलेला धक्काच बसला. महिलेने घडल्याप्रकरणी पतीला माहिती सांगितली. त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधितावर कारवाईकरिता महिलेने पोलिसांकडे मागणी केली आहे.