देश पाहातो आहे! अर्थसंकल्प अधिवेशनाआधी मोदींचा विरोधकांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

संसदेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनाला आज पासून सुरुवात होत आहे. मोदी सरकारचे हे शेवटचे आणि निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जाणारे अधिवेशन ठरणार आहे. त्यामुळेच अधिवेशनाच्या आधी पत्रकारांना त्याची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना देशाच्या जनतेचे संसदेकडे लक्षं आहे, तेव्हा अधिवेशन सुरळीत चालू द्या, अशा प्रकारचा इशारा दिला आहे.

आज राष्ट्रपती दोन्ही सदनाच्या सदस्यांना संबोधित करतील, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले की आज देशात जागरूकता आली आहे. प्रत्येक नागरिक सदनात काय कामकाज सुरू आहे ते बारकाईने पाहतो. संसदेत घडणाऱ्या साऱ्या गोष्टी देशातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचते. त्यामुळे सभागृहात जर योग्य दिशेने चर्चा झाली नाही तर समाज निराश होते. त्यामुळे जनतेच्या भावनांचा आदार राखत सर्व खासदार अर्थसंकल्प अधिवेशनाचा उपयोग सखोल आणि विस्तारित चर्चेत सहभागी होत करतील, असेही ते म्हणाले. संसदेतील चांगल्या वातावरणाचा परिणाम मतदारसंघात पाहायला मिळेल. त्यामुळे खुल्या मनाने चर्चा झाली तर सरकार त्याचे स्वागत करेल, असेही मोदींनी सांगितले.