
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर घोषणांचा पाऊस पाडला. यंदाच्या बजेटमध्ये कामगार क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. कामगारांसाठीची ग्रॅच्युइटीची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. तसेच नवीन पेन्शन योजनेमध्येही काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहेत.
कामगारांसाठीची ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढविण्याची घोषणा करताना गोयल यांनी जास्तीत जास्त 20 लाख रुपयांची ग्रॅच्युइटी दिली जाणार असल्याचे सांगितले. तसेच ग्रॅच्युइटी ही करमुक्तच राहणार असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले. सध्या ग्रॅच्युइटीसाठीची जास्तीत जास्त मर्यादा 10 लाख रुपयांची आहे.
नवीन पेन्शन योजना ही अधिक आकर्षक बनविण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. या योजनेच्या अंशदानातील सरकारचा वाटा चार टक्क्यांनी वाढवून तो आता 14 टक्के केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.


























































