
सामना प्रतिनिधी । पोईप
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यात कोट्यवधींचा विकासनिधी शिवसेना-भाजप युती शासनाच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी एकाचवेळी २० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आणखीही निधी मंजूर होणार असून येत्या काही दिवसात या रस्त्यांच्या कामाची भूमीपूजन होणार आहेत. मात्र विकास होत असताना तो ठेकेदारांना कामे मिळण्यासाठी नव्हे तर जनतेच्या मागणीनुसार विकासकामे होतील. ठेकेदारांच्या क्रशरवर जाण्यासाठी रस्ते बनवले जाणार नाहीत. असा टोला खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी ओवळीये येथे विरोधकांना लगावला.
दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक तसेच आपल्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यातून मंजूर झालेली जी विकासकामे होणार ती दर्जेदार पद्धतीचीच झाली पाहिजे. जनतेचाच या कामांवर लक्ष असेल. त्यामुळे कोणी ठेकेदाराने आदर्शवत काम करण्याच्या बढाया मारण्यापेक्षा काम दर्जेदार झालेच पाहिजे. ही जबाबदारी ओळखून काम करावे. असा सूचक इशाराही खासदार विनायक राऊत यांनी दिला.
राठीवडे-ओवळीये-कसाल या २ कोटी ७० लाख निधीतून होणाऱ्या रस्त्याचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थित पार पडले. काल शुक्रवारी याच रस्त्याचे भूमीपूजन स्वाभिमान पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी केले होते. आज झालेल्या भूमीपूजन सोहळ्यास बांधकाम अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते.
यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, अक्षय रेवंडकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आतू फर्नांडिस, विजय पालव, अरुण लाड, बंडू सांवत, किर्लोस माजी सरपंच दुलाजी परब, उतम गावकर, दिपक राउत विभागप्रमुख, आशु सावंत, सरपंच ओवळीये, हिवाळे सरपंच पुरुषोत्त खेडेकर, भाऊ गावडे,विजय पालव, नंदू गावडे, हिवळा शाखा प्रमुख संजय परब, ओवळीये आपी परब, बाबा सावंत, आदी उपस्थित होते.
२ कोटी ७० लाखाचा निधीदिल्या बद्दल मला खासदार आणि आमदार यांचा अभिमान आहे. या रस्त्याला पहिल्याच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरघोस निधी एकाच वेळी मिळाला आहे. आम्ही राजकारण करत असताना अश्या कामातून जनतेची विकास कामे होत असल्याचे खरे समाधान मिळते. लोकांची कामे करण्यासाठी आता आपली ग्रामस्थाची जबाबदारी वाढली आहे. येत्या निवडणुकीत या मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य शिवसेनेला देणार असा विश्वस बाबा आंगणे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही गावागावात होणाऱ्या विकासकामाची माहिती दिली.































































