लाच स्विकारताना ग्राममसेविकेला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सभामंडपाचे काम करुन घेऊन बील काढण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच घेताना शेवगांव तालुक्यातील ग्रामसेविका दिपा राजळे हिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. यामधुन एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी ई निवीदाद्वारे शेवगांव तालुक्यातील वाघोली येथील सभामंडपाच्या बांधकामाचे काम ग्रामपंचायत वाघोली कडुन घेतलेले होते. त्या प्रमाणे त्यांनी प्रथम टप्प्या प्लींथ लेवलचे काम पुर्ण केले. त्या झालेल्या कामाचा 3 लाख लाख 30 हजार 532 रुपयांचा धनादेश दिल्याच्या बदल्यात यातील ग्रामसेविका दिपा राजळे यांनी आज तक्रारदाराकडुन लाच मागणी पडताळणी कारवाईत सदर धनादेशातील नमुद रकमेच्या पाच टक्के प्रमाणे होणारी 16 हजार 500 रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडुन केल्यानंतर त्यापैकी 16 हजार रुपये लाचेची लाच घेताना पंचासह ग्रामपंचायत कार्यालयात लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधन विभागाचे उपअधिक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक दिपक करांडे, पोलिस निरिक्षक, शाम पवळे, तनवीर शेख, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, राधा खेमनर, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.