येत्या 16 फेब्रुवारीपासून रंगणार ‘मुंबई श्री’चा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शरीरसौष्ठवाची खरी ओळख आणि मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या प्रतिष्ठsच्या ‘मुंबई श्री’चा थरार यंदा भव्यदिव्यच नव्हे तर अनोखा ठरणार आहे. मुंबई शरीरसौष्ठवाला शक्तिशाली करण्याचे ध्येय उराशी बाळगून मैदानात उतरलेल्या आरोग्य प्रतिष्ठानने मुंबई श्रीच्या दिमाखदार आयोजनाचे शिवधनुष्य उचलले असून या प्रतिष्ठत स्पर्धेला स्पार्टन न्यूट्रिशनचे प्रायोजकत्वही मिळवून दिले आहे. त्यामुळे येत्या16आणि17 फेब्रुवारीला परळ रेल्वे वर्क्सशॉपच्या मैदानात रंगणार्‍या या थरारात सुमारे आठ लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव शरीरसौष्ठवपटूंवर केला जाईल,अशी माहिती स्पर्धा आयोजक प्रभाकर कदम यांनी दिली. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल,अशीच या स्पर्धेची तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेतूनच आगामी महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड केली जाणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखविला.