
सामना प्रतिनिधी, मुंबई
ट्विटर या सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवार्ंकग साईटवरील ट्वीट आता एडिट करता येणार आहे. यासाठी कंपनी एक नवे फिचर आणणार आहे. मात्र या फिचरद्वारे तुमचे आधीचे मूळ ट्विटदेखील इतरांना दिसेल, त्याचसोबत नव्याने एडिट केलेले ट्वीटही असेल. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट एडिट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदांचं डिले फिचर आणले जाऊ शकते.
ट्विटरची निर्मिती एसएमएसच्या म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करता येत नाही, त्याप्रमाणे एकदा ट्वीट केल्यानंतर ते ट्वीट जगभरात जातं असं ते म्हणाले. पण लवकरच ट्वीट एडिट करण्यासाठी एक 5 ते 30 सेकंदांचं डिले फिचर आणलं जाऊ शकतं, अशी माहिती ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून असं फिचर उपलब्ध करून द्या, अशी मागणी युजर्सकडून केली जात होती.


























































