शेतकऱ्यांनी पाठवले मोदींना 17 रुपयांचे चेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दोन हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱयांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याची मोदी सरकारने केलेली घोषणा हा एक ‘जुमला’ आहे, असा आरोप करीत देशातील असंख्य शेतकऱयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 17 रुपयांचे धनादेश पाठवले आहेत. सरकारने प्रथम शेतकऱयांची कर्जमाफी करावी आणि मगच हे अनुदान सुरू करावे, पण तेही वाढवून द्यावे, असे या शेतकऱयांनी म्हटले आहे.

17 रुपये एवढय़ा कमी पैशात शेतकऱयाच्या कुटुंबातील लोकांचा चहाचा खर्चही निघणार नाही. यामुळेच आज शेतकरी 17-17 रुपयांचे चेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी आले आहेत, असे किसान काँग्रेसचे राष्ट्रीय संयुक्त समन्वयक राजू मान यांनी सांगितले.

मोदी सरकारने प्रथम आमची कर्जे माफ करावीत आणि नैसर्गिक संकटात नुकसान झालेल्या पिकांना नुकसानभरपाई द्यावी आणि पेन्शन योजनेतील पेन्शन वाढवून शेतकऱयांना द्यावी. असे झाले नाही तर किसान काँग्रेस शेतकऱयांना सोबत घेऊन मोठे आंदोलन सुरू करणार आहे, असा इशारा किसान काँग्रेसचे राष्ट्रीय संयुक्त समन्वयक राजू मान यांनी दिला आहे.

– केंद्र सरकारने आपल्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱयाना वार्षिक सहा हजार रुपये भत्ता देण्याची केलेली घोषणा हा एक जुमला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱयांची केलेली ही फसवणूक आहेत, असा आरोपही राजू मान यांनी केला आहे.

– शेतकऱयांना दिवसाला 17 रुपये देऊन मोदी सरकारने शेतकऱयांच्या जखमांवर मलम लावण्याऐवजी मीठ चोळले आहे, असे टीकास्त्र्ाही राजू मान यांनी केले आहे