
सामना ऑनलाईन । श्रीनगर
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना असल्याचे म्हटले. यानंतर जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. आरएसएस जर देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्षा संघटना आहे, तर मी इंग्लंडची महाराणी आहे आणि हे ट्वीट चंद्रावरून करत असल्याचे उपरोधिक ट्वीट मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मानवी हक्क आणि वैयक्तीक स्वातंत्र्याचा नेहमी आदर केल्याने देशातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ट्वीटद्वारे म्हटले होते. हे ट्वीट रिट्वीट करताना मेहबुबांनी आरएसएसवर निशाणा साधला. हो, आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना आहे, जसे की मी इंग्लंडची महाराणी आहे आणि चंद्रावरून हे ट्वीट करत आहे, असा उपरोधिक टोला हाणाला.
Sure . RSS is the most secular organisation just as I am Queen of England tweeting about this from the moon. https://t.co/m3bu4sbnKV
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) February 5, 2019
























































