
सामना प्रतिनिधी । नागपूर
हिंदु राष्ट्राच्या नावावर दलितांवर अन्याय, अत्याचार सुरु आहेत. संविधानाला हात घालण्याचे काम सुरु आहे. स्वायत्त संस्थांचा राजकीय वापर होतोय. त्यामुळे आंबेडकरी जनतेत रोष आहे. त्याचा उद्रेक निवडणुकीत निश्चितपणे दिसेल, असे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले.
तसेच शहरी नक्षलवादाच्या नावावर सुसंस्कृत दलित नेत्यांना अडविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात प्रा. तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती, याकडे त्यांचा रोख असल्याचे स्पष्ट होत आहे.
10 टक्के आरक्षणाला विरोध
आर्थिक निकषांच्या आधारे दहा टक्के आरक्षणाला आमचा विरोध असून संविधानात त्याची तरतूदच नसल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. आपण स्वत: निवडणूक लढणार नसल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले


























































