एमआयआरसीमधील खडतर प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी 303 जवान लष्करात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका असतानाही त्याची परवा व तमा न बाळगता देशसेवेसाठी येथील एमआयआरसीमधील खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशसेवेसाठी 303 जवान लष्करात दाखल झाले. यावेळी जवानांचे शानदार संचलन पार पडले.

येथील एमआयआरसी येथील मैकनाईज्ड इन्फोस्ट्री रिजेंमेंट सेंटर या ठिकाणी या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पश्‍चिम विभागाचे जनरल ऑफि सर, कमांडींग इन चिफ लेन् फनंट सुरेदर सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, यावेळी लष्करातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लष्करात दाखल झालेल्या जवानांना येथे 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण देण्यात आले होते. ते काल पुर्ण झाले. त्यानंतर त्यांना देवशसेवेसाठी लष्करामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी देशभक्ती जागृती व्हावी यासाठी जवानांना देशाबद्दल भक्ती निष्ठा व धैर्य राखण्यासाठी शपथ देण्यात आली.

यानंतर कठोर प्रशिक्षण घेणार्‍यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. यामध्ये जवान जसविर सिंह यांना जनरल सुंदरजी गोल्ड मेडल, जवान रोहित कुमार यांना जनरल एल डिसोजा सिल्व्हर मिडल तर जवान मोहिती सपाथा यांना जनरल पंकज जोशी रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

सुरूवातीला शहीदांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली व त्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देण्यात आली. त्यानंतर संचलन पार पडले. मोठ्या दिमाखात या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते.