
सामना ऑनलाईन । हॅमिल्टन
तिसऱ्या व निर्णायक टी-20 सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला चार धावांनी मात देत मालिका खिशात घातली. शेवटच्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने सिंगल रन घ्यायला नकार दिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फटकारले आहे. कार्तिकच्या अतिआत्मविश्वासामुळे हिंदुस्थानने सामन्यासह मालिका गमावली अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
Dinesh Kartik’s over-confidence in the last over cost us the T20 series.. when will these basic guys understand not everyone can be Dhoni because we already have one ugh suckas #IndvsNZ
— Rainberry (@piggy_chopps) February 10, 2019
शेवटच्या षटकात हिंदुस्थानला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावांची गरज होती. दिनेश कार्तिक व कृणाल पंड्या मैदानावर फलंदाजी करत होते. कृणाल पंड्याच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थान जिंकणार अशी आशा चाहत्यांना होती. मात्र पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानंतर दिनेश कार्तिकने दुसरा चेंडू वाया घालवला. तिसऱ्या चेंडूवर धाव घेणे शक्य असतानाही दिनेशने नकार देत फॉर्ममध्ये असलेल्या कृणालला स्ट्राईक देण्यास नकार दिला. त्यानंतरही चौथ्या चेंडूवर एकच धाव घेतली. कार्तिकने ज्या प्रकारे कृणालला स्ट्राईक देण्यास नकार दिला त्यावरून आता त्याला ट्रोल केले जात आहे.
That was selfish dinesh kartik very selfish..Krunal pandya has played so well he is a good batsman why decline him a single#INDvNZ
— Arsh (@arsh2397) February 10, 2019
#dineshkarthik #DineshKartik #BCCI
What you wanted to show by not taking run Dinesh Kartik. You should be given permanent rest from team. Overconfident that’s why you are looser.. bcci throw him out..— Rahul Mishra (@ra_p97) February 10, 2019
#NZvIND the most selfish man in cricket is Mr. Dinesh kartik
— aditya swami (@AdityaAvni) February 10, 2019
Dinesh Kartik is NOT a team player. He only plays for himself. He deserves no place in any future Indian Squads. He has proven it today. #INDvNZ
— Shashank (@bhag_BOSEdk) February 10, 2019























































