हार्बरची दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचे प्रचंड हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

हार्बरच्या दोन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसत आहे. रे रोड स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती मिळत आहे.