
सामना प्रतिनिधी । लातूर
शोरूमच्या पार्किंग मध्ये उभा केलेला ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. 5 लाख 60 हजार रुपयांच्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार काशिनाथ शिंदे रा. खाडगाव त्यांचे खाडगाव रोडवर आर के मोटर लातूर नावाची शोरूम असून या शोरूमच्या पार्किंगमध्ये त्यांनी ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 24 ए. एस. 39 हे उभा केलेला होता. पाच लाख 60 हजार रुपयांचा ट्रॅक्टर चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































