
सामना ऑनलाईन। लखनौ
प्रेमभंग यासारखी आयुष्यात दुसरी दुखद घटना नाही. ज्याने आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या तो असा अर्धवट वाटेत सोडून जातो तेव्हा जगण्यातला रसच निघून जातो. खूप एकाकी वाटायला लागतं. अशावेळी कुठेतरी एकांत ठिकाणी वा समदुखी व्यक्तीबरोबर मन मोकळ करावसं वाटतं. ब्रेक अप झालेल्यांची हीच मनोव्यथा लक्षात घेत लखनौमध्ये तीन तरुणांनी ‘बेवफा चाय वाला’नावाची एक छोटेखानी टपरी सुरू केली आहे. जिथे प्रेमभंग झालेल्या तरुण तरुणींना चहात सवलत तर मिळतेच शिवाय निवांत बसताही येते.
या टपरीवर वेगवेगळ्या प्रकारचे चहा गंमतीदार नावाने मिळतात. तंदूरी चाय, बकवास मॅगी, बदनाम कॉफी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चहा, कॉफी येथे मिळतात.
























































