आता कचराकुंड्याही चोरीला जाऊ लागल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत आता चक्क कचराकुंड्याही चोरीला जाऊ लागल्या आहेत. यामध्ये पालिकेने केंद्राच्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत ठिकठिकाणी लावलेल्या तब्बल 42 कचराकुंड्या चोरीला गेल्या आहेत. दहा हजारांवर किमतीच्या या कुंड्यांच्या चोरीची पालिका प्रशासनाने गंभीर दखल पालिकेने घेतली असून या चोरीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यावसायिक क्षेत्रात होणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी पालिकेने स्टीलच्या मजबूत कचराकुंड्या बसवण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये लाखो रुपये खर्च करून रस्ते, फुटपाथ आणि काही सार्वजनिक ठिकाणी पालिकेकडून या स्टिलच्या दोन कुंड्या असलेला सेट बसवण्यात येत आहे, मात्र पालिकेने बसवलेल्या कचराकुंड्यांपैकी तब्बल 42 कचराकुंड्या चोरीला गेल्याची माहिती खुद्द अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी आज स्थायी समितीत दिली. दरम्यान, शहरासह उपनगरात 50 मीटरच्या अंतराकर 1550 कुंड्या लाकण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज मांडलेल्या प्रस्तावावर मत मांडताना सभागृह नेत्या विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, भाजपचे मनोज कोटक, अभिजित सामंत, काँग्रेसचे रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी या कचराकुंड्यांची स्वच्छता कशी राखणार, असा सवाल केला. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कचराकुंड्यांच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे निर्देश देऊन प्रस्ताव मंजूर केला.

नवीन 560 कचराकुंड्या बसवणार
मुंबईतील सोसायट्या आणि खासगी आस्थापनांना कचरा व्यवस्थापन करणे पालिकेने बंधनकारक केले आहेत. यानुसार अनेक सोसायट्यांनी कचरा व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रस्ते, दुकाने, मंडया, रेल्वे-बस स्थानके अशा सार्वजनीक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. कागदाचे लहान तुकडे, थर्माकोल, खाऊच्या पदार्थांची वेष्टने रस्त्याकर जमा होत असल्याने कचरा होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीकर नागरिकांना कचरा कुंड्यांमध्ये टाकता यावा यासाठी शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या दुतर्फा आणि सार्वजनिक ठिकाणी महापालिका स्टेनलेस स्टीलच्या 560 कचराकुंड्या बसविण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.