
सामना ऑनलाईन । देवळाली
हिंदुस्थानच्या लष्कराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या नाशिकच्या देवळाली स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या बॅगत बॉम्ब असल्याची शंका असल्याने बॉम्ब शोध आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
देवळाली स्टेशन उडवून देऊ अशी धमकी देणारं पत्र दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयाकडे आले होते. त्यानंतर या परिसरात गस्त वाढवण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी एका कचरापेटीजवळ एक बेवारस बॅग तिथेल्या जवानांना आढळली. त्यांनी यामाहिती दिल्यानंतर पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोध पथकाने या बॅगचे स्क्रीनिंग केले असून बॅगची तपासणी करण्यात येत आहे.
























































