
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमध्ये झालेल्या ज्यूनिअर इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये सनी लिओनीने टॉप केले आहे. बिहारच्या पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट (पीएचईडी)च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मेरिट लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर सनी लिओनीचे नाव दिसत आहे. परंतु बॉलिवूडमध्ये दिसणार ही सनी लिओनी नाही, हे एका महिला उमेदवाराचे नाव आहे.
पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंट (पीएचईडी)च्या अधिकृत वेबसाईने नुकत्याच झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या वेबसाईटवरील मेरीट लिस्टनुसार सनी लिओनी या उमेदवाराने 98.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. टॉपर सनीचे वय 27 आहे. या लिस्टमध्ये तिच्या वडिलांचे नाव लियोना लियोनी असे दिसत असून अर्जक्रमांक JEC/0031211 हा आहे.
विशेष म्हणजे या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवाराचे नाव bvcxzbnnb असून त्याच्या वडिलांचे नाव mggvghhnnnn असे आहे. या उमेदवाराने 92.89 गुण मिळवले आहेत.

























































