
सामना ऑनलाईन । पाटणा
जम्मू कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम हटवण्याबाबत आपण विचारच करू शकत नाही असे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मित्रपक्ष जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी म्हटले आहे. पाटण्यातील पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.
जे कलम हटवण्यासाठी सत्ताधारी भाजप आग्रही आहे त्याबाबत नितीश कुमारांचे मत विरोधी आहे. नितीश कुमार म्हणाले की, “देशात एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई केली जाईल, जेणेकरून असे हल्ले होणार नाहीत. परंतु याचा अर्थ अस नाही हे कलम काढून जम्मू कश्मीरला एका तरतुदीपासून वचिंत ठेवले जावे.” या मागणीला आम्ही कधीच समर्थन देऊ शकत नाही या बाबत आपल्या पक्षाची भुमिका ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कश्मीरमध्ये एखादी घटना झाली तर कश्मीरी जनतबाबत चुकीचा विचार करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले.























































