
सामना प्रतिनिधी । मनमाड
मनमाड शहरात तीन दिवसांपासून 32 अंश सेल्सियसवर कमाल तापमान स्थिरावले असून उष्णता वाढू लागली आहे. तापमानात काही दिवसापासून वाढ झाली आहे. त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस तापमान 34 अंश सेल्सिअसवर स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच शहराच्या कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. किमान तापमान 16 अंश सेल्सियसवर पोचल्याने उष्णता जाणवू लागली आहे. वातावरणात उष्णता जाणवत होती. मात्र गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून काल तापमान आता 32 अंशावर स्थिरावले आहे.
























































