
सुनील उंबरे । पंढरपूर
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पंढरपूर येथील सभेला रिकाम्या खूर्च्यांची गर्दी झाली. चंद्रभागा साखर कारखान्याचे संस्थापक वसंत काळे यांच्या 70 व्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि शेतकरी मेळाव्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने सुशीलकुमार शिंदे आणिनारायण राणे या नेत्यांना दीड तास तिष्ठावे लागले.

सोहळ्यासाठी विशेष वाहनांची व भोजनाची व्यवस्था केलेली होती. शाही व्यवस्था करुन देखील शेतकऱ्यांनी पाठ दाखविल्याने, अस्वस्थ झालेले कार्यक्रमाचे संयोजक कल्याण काळे यांनी मोठ्या चतुराईने या पाहुण्यांना श्री. विठ्ठल दर्शनासाठी घेऊन गेले.
दरम्यान, काळेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः शाळेतील शिक्षक, साखर कारखान्याचे कर्मचारी, शेतातील मजूर आणून सभा मंडपात कशीबशी गर्दी केली.शेतकऱ्यांनी घातलेला हा अघोषित बहिष्कार माजी मुख्यमंत्र्याबद्दल होता की संयोजक काळे यांच्या बद्दलच्या नाराजीचा याचा मात्र उलगडा झाला नाही.



























































