घरच्यांच्या विरोधाला कंटाळून प्रेमी जोडप्याने घेतला गळफास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुखेड

घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्याने प्रेमी जोडप्याने झाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुखेड तालुक्यातील कासरवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील पारस निवृत्ती नरोटे (२५) व धनश्री माधव चोले (२०) यांचे एकमेकांवर प्रेम होते. याबाबतची माहिती घरच्यांना कळताच त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध केला. पारस नरवटे हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करीत होता तर धनश्री चोले ही नांदेड येथील एका खाजगी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. धनश्री दीड महिन्यांपूर्वी आपल्या कोळनुर या गावी आली होती, पारस गुरुवारी गावातीलच एका विवाह समारंभात गावकऱ्यांना दिसला होता. यानंतर पारसला मुखेड तालुक्यातील कासरवाडी या त्यांच्या आजोळी त्याची प्रियसी धनश्री तिच्यासोबत आला असल्याचे कळले.

शुक्रवारी सकाळी खुशाल देवकते यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोघांचेही मृतदेह गळफास घेऊन लटकत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाला कळविण्यात आली असता पोलीस जमादार सुनील पांडे यांनी घटनेचा पंचनामा केला. यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी दोघांच्याही कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. घटनेचा पुढील तपास पोलिस जमादार सुनील पांडे हे करीत आहेत.