
>> शुभांगी बागडे
मुंबईनजीकच्या नेरळपासून जवळ असणाऱया मालेगाव येथील वसलेली ‘सगुणा बाग’ कृषी पर्यटनासाठी परीचीत असली तरी आधुनिक पद्धतीने कमी श्रम व कमी पैशाद्वारे जास्त फायद्याची शेती कशी करता येईल याबाबत ग्रामीण शेतकऱयांना मार्गदर्शन करणारं हे एक केंद्र आहे आणि असंख्य शेतकरी बांधवांनी भडसावळे काकांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशील शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी मार्गदर्शन केंद्र ठरलेल्या या सगुणा बागेचा प्रवास एका अनोख्या ऊर्मीतून साध्य झाला, असे डॉ. भडसावळे सांगतात. 1976 साली अमेरिकेतील यश, तिथलं मायाजाल धुडकावून हिंदुस्थानात येणं आणि शेतीविषयक संशोधनासाठी ग्रामीण भागात स्थिरावण्याचा निर्णय घेणं हे आश्चर्यकारकच होतं. या निर्णयामागील प्रेरणा स्वाभीमानातून निर्माण झाली होती आणि म्हणूनच हे उत्तुंग यश साध्य करता आलं, असंच चंद्रशेखर भडसावळेंबाबत बोलायला हवं.
सगुणा बागेने काय मिळवून दिलं, तर ग्रामीण जीवनपद्धतीला नसलेली प्रतिष्ठा. शहरी भागातील लोकांची ग्रामीण भागाकडे पाहण्याची दृष्टी. नेरळमधील मालेगाक येथे 55 एकर जागेत पसरलेले हे कृषी केंद्र शेती आणि पर्यटन यांचा अचूक मिलाफ आहे. चंद्रशेखर भडसाकळे यांचे कडील हरिभाऊ भडसाकळे हे कर्जत परिसरातील आदिकासींच्या हक्कांसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी झटले. तोच वारसा वेगळ्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न चंद्रशेखर यांनी केला.
दापोली येथील कोकण कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. ऑग्रिकल्चर पदवी घेतल्यानंतर फूड सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजीची पदवी घेण्यासाठी ते कॅलिफोर्निया येथे गेले. तिथे मत्स्यशेतीचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले. हिंदुस्थानात परत येण्याचा निर्णय घेताना शेतीलाच प्राधान्य द्यायचे हे त्यांनी मनोमन ठरवले होते. त्या वेळी त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साप ठेवलेले होते. त्यांचे विष काढून ते हाफकिन इन्स्टिटय़ूटला देत असत. ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या शाळांच्या सहली येत. खरे तर येथेच त्यांच्या कृषी पर्यटनाचे बीज रोवले गेले, असे भडसावळे काका सांगतात.
1976 साली ते जेव्हा हिंदुस्थानात आले तेव्हा इथे आणीबाणीचे वातावरण होते. आपल्याला जे साध्य करायचे आहे ते गावातच गवसेल याची भडसावळे काकांना खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी सगुणा बागच्या कामाला सुरुवात केली. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे, संकल्पना राबवणे याचा ध्यास घेत त्यांनी नवी पद्धती विकसित केली. मत्स्यशेतीचा प्रयोग यातलाच. इथे कौटुंबिक सहलींपासून कॉर्पेरेट कंपन्यांच्या कार्यक्रमांसाठी पर्यटनपर सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी ग्रामीण बाज जपत पर्यटनाचा आनंद घेता येतो.
भडसावळे काकांच्या सगुणा बागेने कृषी पर्यटनाबरोबर इथल्या शेतकऱयांना विकासाचा मार्ग दाखविला आहे. सुरुवातीला इथल्या आजूबाजूचे शेतकरी कमी उत्पादकतेमुळे शेती करणं सोडून देत होते. त्यांना नफ्याच्या शेतीचे तंत्र भडसावळे काकांनी दर्शविले. प्र. रा. चिपळूणकर यांची शून्य मशागत तंत्राने होणारी भातशेती पाहिल्यानंतर ही पद्धत सगुणा बागेत विकसित केली. त्यांनी या पद्धतीला ‘एसआरटी’ (सगुणा बाग राइस टेक्नॉलॉजी) असे नाक दिले. या तंत्रात एकदाच नांगरणी करून वाफे तयार केले जातात. या तंत्रामुळे माती वाहून जात नाही व त्यामुळे सेंद्रिय कर्ब व जिवाणू टिकून राहण्यास मदत होते. भातशेतीतील या प्रयोगात इतर कडधान्य, फळभाज्या घेणंही सहज शक्य होतं. ही सर्व कमी पाण्यावर असतात. सगुणा बागेत भडसावळे काकांनी विविध पिकांचे विशेषतŠ तांदळाचे वाण विकसित केले आहेत. या वेगळ्या वाटचालीत कृषी पर्यटनाचा वृक्ष चांगलाच डवरला आहे. शहरातले लोक शेतीपासून आणि निसर्गापासून तुटलेले आहेत. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा कर्षांपासून कृषी पर्यटनाची अनेक केंद्रे महाराष्ट्रात सुरू झाली आणि बंदही पडली. मात्र सगुणा बागेचे सातत्य कायम आहे.
महाराष्ट्रात सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दुष्काळाची आणि अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या प्रश्नांची. शेतकऱयांसाठी सरकार आणि सेकाभाकी संस्था काम करतातच. मात्र गेल्या 40 कर्षांपासून चंद्रशेखर भडसाकळे हे शेतकरी कसा सुखी होईल, कमी खर्चात त्याला जास्त उत्पादन देणारा फायद्याचा शेती क्यकसाय कसा करता यईल यासाठी अकिरतपणानं काम करत आहेत. राज्य सरकार आणि अनेक शेतकरी त्यांच्या आधुनिक शेतीच्या प्रयोगांचे मार्गदर्शन घेत आहेत. आजच्या काळात किफायतशीर शेतीउद्योग कसा करता येईल याचे चंद्रशेखर भडसाकळे यांनी स्कतःच्या यशस्की प्रयोगातून शेतकऱयांना उदाहरण दिले आहे.



























































