हिंदुस्थान मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत- ट्रम्प यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। वॉशिंग्टन

पुलवामा हल्ल्यात हिंदुस्थानने आपले 40 जवान गमावले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानच्या भावना समजू शकतो. हिंदुस्थान यावेळी काही तरी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला आहे.

हिंदुस्थान-पाकमधील संबंध स्फोटक बनले आहेत. परिस्थिती अत्यंत खतरनाक आहे असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हिंदुस्थानच्या भूमिकेचे समर्थन केले. हिंदुस्थान-पाकमध्ये सध्या खूपच नाजुक आणि धोकादायक स्थिती बनली आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. आमची चर्चा सुरू आहे. चर्चेच्या प्रक्रियेत इतर अनेकांचा सहभाग आहे. चर्चेत समतोल साधणे हेच मोठे आव्हान आहे असे ट्रम्प यांनी सांगितले.