बीड जवळ भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड 

बीड जवळील पाली येथे सोलापूर – संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.  बीड पासून नऊ कि मी अंतरावर सोलापूर – संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर पाली या गावाजवळ बिंदुसरा या मध्यम प्रकल्पाशेजारी आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अल्टो आणि ट्रक चा सामोरा समोर भीषण झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बीडच्या जिल्हारुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.