
सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. फिरकी गोलंदाज मयांक मार्कंडे याचा टी-20मधील हा पदार्पणाचा सामना असणार आहे.
Mayank Markande all set to make his T20I debut for #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/Ogv0V1iHzO
— BCCI (@BCCI) February 24, 2019
इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवार ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका हिंदुस्थानसाठी महत्त्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हिंदुस्थानविरुद्ध दोन टी-20 आणि पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या संघ निवडीसाठीही ही मालिका महत्त्वाची असेल.
21 वर्षीय मयांक मार्कंडे याने 2018 मध्ये झालेल्या आयपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळताना धमाल उडवून दिली होती. त्याने 14 सामन्यात 15 बळी घेतले होते. तसेच प्रथम श्रेणीच्या सात सामन्यात त्याच्या नावावर 34 बळी आहेत.





























































