
सामना प्रतिनिधी । नगर
नगरमधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहेरबाबा नगरकेंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या 125 वा जन्मोत्सव कार्यक्रमात सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पहाटे 6 वाजता मेहेरबाबांच्या जयघोषाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी सिनेअभिनेत्री अर्शिन मेहेता, अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी, उपाध्यक्ष वैभव जोशी आदी मान्यवरासह नगरसह देशविदेशातील भाविक यावेळी उपस्थित होते. विविध भाविकांनी गीते, बाबांची भजने सादर केली. तर मेहेरनाथ कलचुरी यांनी बाबांच्या कार्याविषयी, त्याचा आध्यत्मीक 5 गुरुंविषयी व बाबांना पाहून साईबाबांनी पर्वदिगार का म्हटले याची माहिती दिली. नंतर आरती प्रार्थाना करण्यात आली व प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मेहेरबाद टेकडी (अरणगाव) येथील बाबांच्या समाधी ठिकाणी जन्मोत्सव सोहळा झाला. त्या ठिकाणीही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. नगरमध्ये जन्मोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम सुरु झाले असून नगरमधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहेरबाबा नगरकेंद्रामध्ये दररोज रात्री जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.
























































