Air Strike कंदहार विमान अपहरणाचे मुख्य सूत्रधारही खल्लास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये कंदहार विमान अपहरणातील दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात मसूद अजहरच्या दोन भावांचाही समावेश आहे. इब्राहिम अझहर आणि मौलाना तल्हा अशी त्याच्या दोन भावांची नावे आहेत. अब्राहिम अझहर हा मसूदचा मोठा भावाचा कंदहार विमान अपहरणात हात होता. तसेच त्याच्याकडे अफगाणिस्तान आणि कश्मिरमधील दहशतवादी कारवायांची जबाबदारी होती.

तल्हा या मसूदच्या दुसऱ्या भावाकडे दहशतवाद्यांना तयार करण्याची जबाबदारी होती. या हल्ल्यामध्ये मसूद अजहरचे दोन मेहुणे देखील ठार झाले आहेत. त्यात मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहर उर्फ उस्ताद गोहरी याचाही कंदहार विमान अपहरणात हात होता. हिंदुस्थानच्या या धडक कारवाईत कंदहार अपहणातील दोन सूत्रधारही ठार झाले आहेत.

1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून कंदहारला नेण्यात आले होते. विमानातील प्रवाशांना सोडवण्यासाठी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरसह तीन दहशतवाद्यांची हिंदुस्थानला सुटका करावी लागली होती. 2002 मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला दिलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत युसूफ अझहरचाही समावेश होता.