शोपिया जिल्ह्यात जैश ए मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार, हत्यारे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांनी चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली आहे. मृत दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे असून त्यातील एक पाकिस्तानी होता तर दुसरा कश्मीरचाच रहिवासी होता.

शोपिया जिल्ह्यात पोलिसांना अतिरेकी असल्याची खबर मिळाली होती. खबर मिळाल्यानतंर पोलिसांनी शोध मोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि चकमक सुरू उडाली.

पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे आहेत. एका दहशतवाद्याचे नाव सुहेल नजीज मीर असून तो शोपिया जिल्ह्याचाच रहिवासी होता. तर दुसरा दहशतवादी पाकिस्तानचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवायांसह अनेक गुन्हे दाखल होते. या चकमकीत कुठलीच वित्तहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच घटनास्थळी पोलिसांनी हत्यारे व दारूगोळा जप्त केले आहेत.