
सामना ऑनलाईन । पालघर
पालघरच्या डहाणू तलासरी भागात आज पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी 11.14 वाजता मोठा धक्का बसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
आज जाणवलेल्या धक्क्यानंतर भूकंप क्षेत्राचा विस्तार वाढल्याचे बोलले जात आहे. कारण गुजरातच्या उंबरगाव पासून पालघरच्या तारापूरपर्यंत हा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Earthquake with a magnitude of 4.3 on the Richter scale hit Palghar district of Maharashtra at 11 am today.
— ANI (@ANI) March 1, 2019






























































