
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक करून 300 दहशतवाद्यांना मारले होते. त्यानंतर हिंदुस्थान सरकार हुर्रियत संघटनेवर बंदी आणण्याच्या विचारात आहे. गृह मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार मोदी सरकार यावर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पुलावामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासीन मलिक, गिलानीसह 18 फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. जम्मू कश्मीर सरकारने खोर्यातील 18 हुर्रियत नेते आणि 160 राजकारण्यांची सुरक्षा काढली होती.

























































