‘ती अँड ती’ मध्ये सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अप्सरा म्हटलं की सोनालीच आठकते…सोनालीचा ‘ती अँड ती’ हा आगामी मराठी सिनेमा लककरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमातील सोनालीची भूमिका पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांकडे अनेक किशेष कारणं असतील. त्यापैकी काही कारणं म्हणजे सोनालीचा ग्लॅमरस लूक. ज्यामध्ये ती खूपच आकर्षक आणि हॉट दिसतेय आणि तिने तिचा हा लूक अगदी उत्तमरीत्या कॅरी केला आहे. अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमात सोनाली पुष्कर जोगसोबत स्क्रिन शेअर करत आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णीसोबत प्रार्थना बेहरेदेखील प्रमुख भूमिका साकारत आहे. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प्स एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मीडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. कैषल शाह, पुष्कर जोग आणि मोहन नदार ह्यांची निर्मिती असलेला ‘ती अँड ती’ 8 मार्च रोजी सर्कत्र प्रदर्शित होत आहे.