अल्पवयीन मुलावर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितास पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत आत्माराम जाधव (वय 37, रा. चंदननगर, पुणे) याला अटक करून ओरोस येथील न्यायालयात हजर केले असता 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेवतळे येथील एका बंगल्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग करण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी त्या मुलीच्या पालकांनी संशयित प्रशांत आत्माराम जाधव याला पाठलाग करत पकडले. याप्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार रात्री उशिरा त्याच्याविरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार व संरक्षण कायदा 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा फॉरेन्सिकच्या पथकाने पंचनामा करत आवश्यक नमुने घेतले असून पुढील तपास सुरू आहे. जाधव याला अटक करून ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मोमीन करत आहेत.