करिअर करायल्या निघालेल्या दोघी बहिणींचे अपहरण? तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सामना प्रतिनिधी । सातारा

करिअर करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणी सातारा येथून बेपत्ता झाल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

साताऱ्यातील 14 आणि 15 वय असेलेल्या दोघी बहिणींनी घरातून बाहेर पडण्याआधी एक चिठ्ठी लिहिली होती. करिअर करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडत आहोत अशा आशयाची ही चिठ्ठी आहे. दोघी घरात नाही हे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही चिठ्ठी हाती लागली. नातेवाई, मित्रमैत्रिणींना चौकशी केल्यानंतर ही त्यांच्याविषयी काहीच माहिती न मिळाल्याने अखेर दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.