
सामना ऑनलाईन। अहमदाबाद
हिंंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे देशवासियांमध्ये पुन्हा एकदा देशभक्ती संचारली आहे. सगळ्याच स्तरावर हवाई दलाच्या साहसी कारवाईची वाहवा होत आहे. जवानांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. याचपार्श्वभूमीवर गुजरातमधील सूरत येथे सर्जिकल स्ट्राईकचे चित्र असलेली साडी बाजारात विक्रीस आली आहे.
How’s the Josh?, Jai Hind आणि salute the pilots of the IAF असे शब्दही या साडीवर लिहण्यात आले आहेत. ही साडी खरेदी करण्यासाठी तरुणींची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या साडीवर जवान आणि मिग विमानाचेही चित्र आहे. युद्धभूमीतले क्षण या साडीवर छापण्यात आले आहेत.
























































