2019 ला पण मीच निवडून येणार, काय हवं असेल तर सांगा: पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद 

2019 ला पण मीच निवडून येणार असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये व्यक्त केला. तसेच, काळजी करू नका, मी पुनरागमन करेन, केंद्र सरकारकडून काही हवं असेल तर मला सांगा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला म्हटले. जसपूरमधील पाटीदार समाजाच्या उमिया माता मंदिराच्या भूमीपुजनावेळी ते बोलत होते.

उमिया माता संस्थेला शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की, या कार्यासाठी तुम्हाला काही लागलं तर माझे घर नवी दिल्लीमध्ये आहे. आणि काळजी करू नका. २०१९ च्या निवडणूकी नंतर पण मी असेन.” तसेच देशाला दहशतवादाचा आजार झाला असून तो संपवला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. आपल्या सैन्याव तुमचा विश्वास आहे की नाही? आपल्या सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? आपल्या सैन्यावर सर्वांना अभिमान वाटला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.